सुनील तटकरेंनी भाजपला दिला मोलाचा सल्ला, म्हणतात…

रत्नागिरी : उध्दव ठाकरे यांचे सरकार येत्या डिसेंबरमध्ये कोसळणार आहे, असे आरोप भाजपकडून केले जात आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपच्या 100 आमदारांना मध्यावधी निवडणुका हव्यात, असं वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष कार्यरत रहाणार आहे,’ असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

ते रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडीतील सेना आणि राष्ट्रवादीमध्ये नक्कीच समन्वय आहे. महाविकास आघाडीला पाडण्यासाठी महाविकास आघाडीमधील कुठलाच आमदार प्रतिसाद देत नाही. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्ही आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचं उत्तर दिलं,’ असा टोला त्यांनी लगावला.

Loading...

तसेच ‘भाजपने महाविकास आघाडीची सत्ता पाडणे सोडा, त्यापेक्षा भाजपची संघटना जी विस्कळीत झाली आहे, ती व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे,’ असा खोचक सल्ला सुनील तटकरे यांनी भाजपला दिला आहे. तसेच सत्तेपासून बाजूला गेल्याने माशाची जशी पाण्यासाठी तडफड होते, तशी भाजपची अवस्था झाली आहे,’ असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘ भाजपने कितीही टोलेबाजी केली तरीही पाच वर्षात सत्ता बदल होणार नाही,’ असा विश्वास देखील व्यक्त केला. ‘सत्ता गेल्याचे इतके वाईट वाटते, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करीत असलेल्या बेताल वक्तव्यांवरुन दिसूत येते. आमच्या पक्षातून आऊट गोईंग झालेले आणि ते पुन्हा भाजपमधून बाहेर पडू नयेत, म्हणून त्यांना अनेक आमिषे दाखविली जात आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत