शिवसेना लाचारासारखी सत्तेला चिकटून- सुनील तटकरे

सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा- सिंहाच्या जबड्यात हात टाकून दात मोजण्याची भाषा मुख्यमंत्री करतात. आणि सेना लाचारासारखी सत्तेला चिकटून आहे. महाराष्ट्राचे लचके तोडणाऱ्या या दोन्ही पक्षांना आता बाजूला सारण्याची वेळ आली आहे. चला अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनासाठी तयार होऊया. असं ट्विट सुनील तटकरे  यांनी केलं आहे.

राज्यात साडेतीन वर्ष बिनपैशाचा तमाशा सुरु आहे. एकजुटीची वज्रमुठ सरकारच्या माथ्यावर हाणण्यासाठी सज्ज व्हा. खोटारडया सरकारच्या विरोधात हे हल्लाबोल आंदोलन आहे. हिंगोलीवासियांनो, साथ दया. असे हल्लाबोल आंदोलनात सुनील तटकरे बोलत होते.