सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तटकरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे चार वर्ष प्रदेशअध्यक्ष म्हणून काम केले आता मला जबाबदारी मुक्त केले तर बरं होईल, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादीच्या नवीन प्रदेश अध्यक्ष निवड २९ एप्रिलला पुण्यात होणार असून प्रदेश अध्यक्षपदी पुन्हा इच्छुक नसल्याच सांगत नवीन नियुक्त करावे असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट होते. दरम्यान त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.

सुनील तटकरेनंतर सांगलीतील जयंत पाटील आणि सातारा जिल्हातील शशिकांत शिंदे यांची नावे चर्चेत असून जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय आहेत. तर सातारा येथील शशिकांत शिंदे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांवर निर्णय घेणार आहेत.

काय म्हणाले होते सुनील तटकरे

पक्ष श्रेष्ठी यांना मी सांगितले आहे की मी चार वर्ष प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले आता मला जबाबदारी मुक्त केले तर बरं होईल. मी जितके वेळ द्यायचा तितका वेळ दिला. पक्ष वाढवण्यास प्रयत्न केले.

 

You might also like
Comments
Loading...