fbpx

सुनील तटकरे यांची लोकसभेत राष्ट्रवादीच्या उपगटनेता पदी नियुक्ती

टीम महाराष्ट्र देशा : रायगड लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजय मिळवत दिल्ली गाठलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुनील तटकरे यांची लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपगटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माझी लोकसभेत उपगटनेता पदी नियुक्ती करण्यात आली आहे, याबद्दल पक्षाचे आणि खा. शरद पवार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या संधीचा मी आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व लोकांच्या हितासाठी पूर्ण उपयोग करेन. अशा भावना सुनील तटकरे यांनी या निवडीनंतर व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशात प्रदेशाध्यक्ष पदाचा अनुभव असल्याने तटकरे यांच्यावर राज्यात देखील पक्षाला यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे तटकरे आता त्यांच्यावर सोपवलेल्या या नव्या जबादारीचे कशा पद्धतीने पालन करतात हे पाहणं महत्वाच असणार आहे.