सुनील शेट्टीचा मुलगा ‘अहान’ लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर…

सुनील शेट्टीचा मुलगा ‘अहान’ लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर…

aahan

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच त्याच्या आगामी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. सुनील शेट्टीप्रमाणे आता त्याचा मुलगा देखील बॉलिवूड गाजवणारा अशी चर्चा सुरू आहे.

ट्रेलरवरून रोमँटिक स्टोरी दिसत असून ड्रामा आणि ॲक्शन देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले आहे. तसेच अहान आणि तारा यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर हा पहिला मोठा आणि रोमँटिक चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच चित्रपटाची गाणी देखील मनाला स्पर्श करणारी आहेत. अहानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा एक पोस्टर फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत असून तो अभिनेत्रीसह रोमान्स करताना दिसत आहे.

सुनील शेट्टीच्या मुलीने या आधीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. साल २०१५ मध्ये आलेला चित्रपट ‘हिरो’ हा अथिया शेट्टीचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर ती ‘मोतीचूर चकनाचूर’, ‘नवाबजादे’ या चित्रपटांमध्ये झळकली होती. तसेच सुनील शेट्टीचा मुलगा अहानचा’तडप’ हा पहिलाच चित्रपट असून चाहत्यांप्रमाणेच सुनील शेट्टीला देखील मुलाच्या पहिल्या चित्रपटाची मोठी उत्सुकता लागली आहे हे. अहान शेट्टीच्या या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी (२७ ऑक्टोबर) प्रदर्शित करण्यात आला. आता चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे.