‘हा मावळातला मावळा आहे, रस्त्यावर उतरला तर काय उद्रेक होईल हे सांगता येत नाही’

sunil shelake

मुंबई : देशात गेल्या काही वर्षांपासून बेरोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा विरोधक करत असतात. देशातील बेरोजगारी झपाट्याने वाढत असतानाच त्यात कोरोनाची भर पडली आहे. हाच मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी राज्य सरकारने कंपन्यांवर अंकुश आणावा अशी विनंती केली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कोरोना काळात कंपन्यांनी आर्थिक डबघाईचं कारण देत गेली कित्येक वर्षे कंपनीत काम करून संसाराचा गाढा हाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगत या कंपन्यांवर राज्य सरकारने काही अंकुश आणावे अशी मागणी सुनील शेळके यांनी केली आहे.

ज्या कंपन्या तडकाफडकी कर्मचाऱ्यांना काढून टाकतात त्यांना जाब विचारायला गेल्यावर ते आम्हाला केंद्र सरकारचा जीआर हाती थोपवतात. ज्यामध्ये ३०० ज्या कंपनीमध्ये ३०० किंवा त्याहून कमी कामगार आहेत, त्यांचा विभाग वा पूर्ण कंपनीचं बंद करताना केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. नोकरकपात करताना देखील परवानगी घेण्याची गरज नाही, असा हा आदेश आहे. मात्र, मुजोर कंपन्यांनी कोरोनाचा गैरफायदा घेतला आहे.

मावळ, चाकण, शिरूर असा औद्योगिक पट्टा असो वा हिंजवडी, बाणेर, माण सारखा आयटी कंपन्यांचा पट्टा असेल, या भागात उत्तर महाराष्ट्र, कोकण भागातील तरुणांसह स्थानिक युवक देखील काम करत असतात. मात्र, आता या भूमिपुत्रांनाच रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे सरकारने योग्य निर्बंध आणावेत अन्यथा हा मावळतला मावळा आहे, रस्त्यावर उतरला तर काय उद्रेक होईल हे सांगता येत नाही, असा इशारा सुनील शेळके यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या