Sunil Raut। मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली होती. ‘सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला’, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यांच्या टीकेला आता संजय राऊतांचे भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मीडियाशी संवाद साधताना सुनील राऊत यांना मुख्यमंत्र्यांच्या टीकेविषयी विचारण्यात आले. त्यावर सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
राऊत म्हणाले की, ‘संजय राऊत यांचा भोंगा सुरू होता, म्हणूनच महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडी झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळाले. हा भोंगा वाजला नसता तर शिंदेंना नगरविकास खाते मिळाले असते का? हा भोंगा वाजला नसता तर एकनाथ एकनाथ शिंदे मंत्री झाले असते का? शिंदेंना जे काही मिळाले ते या भोंग्यामुळेच,’ अशा शब्दात त्यांनी टीका केली.
एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करताना सुनिल राऊत म्हणाले, ‘ जे आज मंत्री झाले त्यांनी कारवाईला घाबरून आपले भोंगे बंद केलेत. परंतु संजय राऊत यांच्यामुळेच यापुर्वी हे मंत्रीपदावर आले होते. संजय राऊत यांचे वय 61 आहे. इतकेवर्ष त्यांनी काही काम केले नाही का? भाजप संजय राऊत यांच्या भोंग्याला घाबरून कारवाई करतंय. हे सूडाचं राजकारण सुरु आहे, हे स्पष्ट आहे.
दरम्यान, मात्र या सर्वांवर मात करत सत्याचा विजय होणार असून राऊतांची सुखरूप सुटका होईल. त्यानंतर शिवसेना प्रमुखांना उध्दव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसवणार..आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा सुनिल राऊतांनी दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit pawar | “नुकसानग्रस्त भागात तातडीने मदत द्या”; अजित पवारांची सातत्याने मागणी
- Ajit Pawar । मंत्रिमंडळ विस्तार करायला सरकार कशाला घाबरत आहे?; अजित पवार आक्रमक
- Sudhir Mungantiwar | काही लोक राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या मालकीचा समजतात – सुधीर मुनगंटीवार
- Ajit pawar | “राज्यातील १३ कोटी जनता आशेने पाहत आहे”; अजित पवार सरकारवर आक्रमक
- Shiv Sena । कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे, तर युवासेनेची धुरा तेजस ठाकरेंकडे? शिवसेनेत मोठे फेरबदल होणार?
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<