Share

Shivsena | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची असणार का? सुनील राऊत म्हणाले…

मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मागच्या सभेला शिवसेनेने व्यासपिठावर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत तुरुंगात असल्याने संजय राऊत (Sanjay Raut) यांची खुर्ची रिकामी ठेवली होती. मग आताही संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवणार का?, असा सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले सुनील राऊत ?

दरवर्षी दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी संजय राऊत बसायचे. यावर्षीही त्यांची खुर्ची व्यासपीठावर असेल, असं सुनील राऊत यांनी सांगितलं आहे. सुनील राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत लवकरच तुरुंगातून बाहेर येतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

शिवसेनाप्रमुखांची शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याची परंपरा आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आम्हाला कोटींच्या जाहिराती किंवा हजारो बसेस भरून कार्यकर्त आणण्याची गरज नाही, असं म्हणत सुनील राऊत यांनी शिंदे गटावर (Shinde Group)  चांगलाच हल्ला केला असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर शिवाजी पार्कचे मैदान शिवसैनिकांनी तुडूंब भरले जाईल, असा दावाही त्यांनी याठिकाणी केला आहे.

संजय राऊत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र विसरला नसल्याचं सुनील राऊतांनी सांगितलं. तसेच, संजय राऊत यांना पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलं आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  संजय राऊतांची तुरुंगातून लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी त्यांच्या निवासस्थानी एक पूजा देखील करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now