fbpx

विभागीय आयुक्तपदी डॉ. पुरुषोत्तम भापकर कायम

purushottam bhapkar and sunil kendrikar

औरंगाबाद : राज्यातील बारा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश शनिवारी सरकारच्या वतीने काढण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त म्हणून क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांना रूजू होऊ नका असा एसएमएस मिळाला त्यामुळे सोमवारी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेण्यासाठी सुनील केंद्रेकर आलेच नाहीत.

विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रात्रीतून सुत्रे हलवून केंद्रेकरांना रूजू होण्यापासून रोखल अस बोलल जात आहे. तसच सुनील केंद्रेकर औरंगाबादेत येऊ नयेत आणि भापकरच विभागीय आयुक्त म्हणून राहावेत यासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह काही पुढाऱ्यांनी आपले राजकीय वजन वापरल्याची सुधा चर्चा रंगली आहे.

दरम्यान, निवृत्तीसाठी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची मुंबई येथे पशुसंवर्धन खात्याचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. सोमवारी त्यांना नव्या पदाचा पदभार स्वीकारायचा होता.