पुणे महापालिका तिजोरीची चावी सुनील कांबळेंकडे, स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

sunil kambale elected as chairman of the pune corporation Standing Committee

टीम महाराष्ट्र देशा: पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे जेष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कांबळे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ असून, आजवर ते चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दाखल करण्यात आलेली स्मिता कोंढरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली, त्यामुळे भाजपचे उमेदवार असणारे सुनील कांबळे यांची स्थायीच्या अध्यक्षपदी बिनविरोध वर्णी लागली आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

पुणे महापालिका नवनियुक्त स्थायी समिती सदस्य

सुनील कांबळे – अध्यक्ष

भाजप सदस्य
1) राजेंद्र शिळीमकर
2) हेमंत रासणे
3) प्रकाश उर्फ बंडू ढोरे
4) दीपक पोटे
5) हिमाली कांबळे (रिपाई)

राष्ट्रवादी काँग्रेस
1) महेंद्र पठारे
2) अशोक कांबळे