त्रिपुरात डाव्यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावणारा ‘मराठी पठ्या’

sunil devdhar the hero of tripura victory

टीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य जिंकून भाजपाने डाव्यांच्या गडाला सुरुंग लावत हे राज्य काबीज केले आहे. त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. सुनील देवधर यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाला त्रिपुराचा गड काबीज करता आला.  सुनील देवधर यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच भाजपला त्रिपुरा काबीज करण्यात यश मिळालं आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामध्ये भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. कारण येथे भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या सीपीएमला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. पण सुनील देवधर यांनी डाव्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून, तिथे सत्तापालट करण्याचे महत्त्वाचे काम या विधानसभा निवडणुकीत केले. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते. माणिक सरकार गेली सलग २० वर्षे मुख्यमंत्री पदावर होते त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कामाच्या पार्श्वभूमीवर विजय मिळवणे अत्यंत कठीण काम होते.

Loading...

जाणून घेऊया कोण आहेत सुनील देवधर

सुनील देवधर यांचा जन्म पुण्यात झाला. लहानपणीपासून संघाच्या मुशीत वाढलेल्या देवधरांनी तब्बल 12 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून ईशान्य भारतात काम केलं आहे. शिवाय, बंगाली भाषेसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभूत्व आहे. मेघालय, त्रिपुरा, नागालँडमधील खासी आणि गारो सारख्या स्थानिक जातींमधील लोकांत त्यांच्या चांगला जनसंपर्क आहे.

sunil dev dhar

  • 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या निवडणुकीत त्यांच्याकडे 10 मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी होती. त्यातील सात जागांवर त्यांनी भाजपला विजय मिळवून दिला.
  • 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सुनील देवधर यांच्यावर प्रचार व्यवस्थापकाची जबाबदारी होती.
  • नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुनील देवधर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनितीकार म्हणून काम करत होते.
  • देवधर यांनी मेघालयमध्ये आरएसएस प्रचारक म्हणूनही काम केले आहे.52 वर्षांचे सुनील देवधर आरएसएसच्या तालमीत तयार झाले असून त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले.
  • त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली.
  • आदिवासी बहुल भागातील मते भाजपाकडे वळवण्यासाठी देवधर यांनी जानेवारी महिन्यात आयपीएफटीसोबत आघाडी केली.
  • आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही हे सुनील देवधर यांनी जाहीर केले आहे.
  • दरम्यान, 2005 पासून ‘माय होम इंडिया’च्या नावाने एक स्वयंसेवी संस्थादेखील सुरु केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील नागरिकांना सर्वप्रकारची मदत केली जाते. ‘माय होम इंडिया’च्या कामाचा फायदा भाजपला या निवडणुकीत झाल्याचे बोलले जात आहे.
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी