सुनेत्रा पवारांची सिनेटवर वर्णी ?

pune univarsity

टीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुकीत व्यवस्थापन आणि पदवीधर गटातून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या १४३ अर्जांची छाननी शुक्रवारी झाली.व्यवस्थापन महिला गटाताल एका जागेसाठी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांचा अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सिनेटवर निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पवार यांचा व्यवस्थापन खुल्या गटातीलही अर्ज अवैध ठरल्याने त्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे दाद मागितली आहे.

विद्यापीठाच्या निवडणूक विभागाच्या माहितीनुसार व्यवस्थापन खुल्या गटातून श्यामकांत देशमुख, संदीप कदम, राजेंद्र विखे पाटील, महेश ढमढेरे, सोमनाथ पाटील, हेमंत धात्रक, राजीव जगताप, दीपक शहा, अशोक सावंत यांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर, दत्तात्रय पानसरे, नीलिमा पवार, रमेश थोरात यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, व्यवस्थापन एससी गटाच्या एका जागेसाठी पुणे विद्यार्थी गृह या संस्थेमार्फत राजेंद्र कांबळे यांनी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे आता गटासाठी एकही अर्ज नसल्याने जागा रिक्त राहणार की इतर राखीव प्रवर्गाला देण्यात येईल, याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पवार यांचे मतदार यादीत माहेरचे आडनाव तर निवडणुकीच्या अर्जात पवार आडनाव असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे.

अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेल्यांनी त्यांनी डॉ. करमळकर यांच्याकडे दाद मागितली आहे. त्यावर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.पदवीधर गटामध्ये सर्व प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. मात्र, विद्यापीठ विकास मंचच्या बागेश्री मंठणकर यांचा पदवीधर महिला, एससी गटातून डॉ. सुनील भंडगे आणि एनएसयूआयचे रोहण शेट्टी यांचा खुल्या गटातून अर्ज अवैध ठरला आहे.

1 Comment

Click here to post a comment