Akola- सुंदराबाई खंडेलवाल टॉवर ला 151 वर्ष पूर्ण

पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते झाल होत उद्घाटन

अकोला : विदर्भातील कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला येथील टॉवर चौक प्रसिध्द आहे. तर ग्रामीण लोक घंटा घर म्हणून सुद्धा ओळखतात. शहरातील वर्दळीचा चौक म्हणून टॉवर चौकाची वेगळी ओळख. टॉवर चौक प्रसिध्द आहे तो सुंदराबाई खंडेलवाल टॉवर मुळे. सुंदराबाई खंडेलवाल टॉवरचे उद्घाटन 12 फेब्रुवारी 1962 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी नगरपालिकेच्या कामाची प्रशंसा केली होती. आज या टॉवर ला आज 151 वर्ष पूर्ण होत आहेत. आधी अकोला ही नगरपालिका होती. आता महानगर पालिका असून वीकास नाही.  टॉवर ची उंची 87 फूट आहे, त्यात पाच मजले आहेत. टॉवरवर पाच फूट व्यासाचे घड्याळ आहे. टॉवरचे संपूर्ण बांधकाम दगडाचे आहे. हे बांधकाम स्थापत्य शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आधी अकोला नगरपालिका असतांना राज्यात पहिल्या क्रमांकाची नगरपालिका होती. त्याचे श्रेय स्व.विनयकुमार पाराशर यांना दिले जाते.

bagdure
You might also like
Comments
Loading...