fbpx

सनबर्नच्या आयोजकांनी खोटी माहिती देवून परवानगी मिळवली-दगडे पाटील

dagade patil kiran

पुणे :सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांनी खोटी माहिती देवून फेस्टिवल आयोजित करण्याची परवानगी मिळवली असल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी फेस्टिवल ला आपला विरोध दर्शवला आहे बहुचर्चित सनबर्न फेस्टिवल पार पाडण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. तरी देखील बावधन परिसरात धुमधडाक्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलच्या विरोधात उद्या (दि. 24) चांदणी चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी दिली.

गावातील वातावरण हे वारकरी संप्रदायाला पोषक असे असून अनेक गैरप्रकार सनबर्न फेस्टिवलमध्ये आमली पदार्थांचे सेवन यासारखे बरेच प्रकार घडतात त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत. शिवाय बावधन गावात जाण्याकरिता एकच रस्ता असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्याप्रमाणावर त्रास होणार आहे . या रास्ता रोकोबाबातचे निवेदन हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण वायकर यांना शुक्रवारी किरण दगडे पाटील यांनी दिले. परसेट लाईव्ह प्रा. लिच्या वतीने सनबर्न फेस्टिवल 28 ते 31 डिसेंबर बावधन येथे होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी रविवारी हे आंदोलन सकाळी 10.30 वाजता उभारण्यात येणार असून, यावेळी रास्ता रोको करण्यात येणार आहे.