यंदा सुद्धा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ वादाच्या भोवऱ्यात

पिंपरी-चिंचवड : येत्या २८ ते ३१ डिसेंबर दरम्यान पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात यंदाचा ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ होणार आहे. गेल्या वर्षी पुण्यातील वाघोली जवळील केसनंद परिसरात हा फेस्टिव्हल झाला होता याला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरल होत.

गेल्या वर्षी देखील पुण्यात झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हलला मोठ्या विरोधाला सामोर जाव लागल होत. यंदा सुद्धा तसाच विरोध या फेस्टिव्हलला होत आहे. पाश्चात संस्कृतीला बढावा देणारा हा फेस्टिव्हल रद्द करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना भापकर यांनी पत्र पाठविले आहे. या पत्रात साधू-संतांच्या परिसरात अशा प्रकारचे फेस्टिव्हल ठेवून संस्कृती विरुद्ध काही तरी करण्याचा आयोजकांचा डाव आहे. या फेस्टिव्हलची सोशल मीडियावर जोरात जाहिरात सुरू असून, ठिकठिकाणी तिकीट उपलब्ध होत आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या फेस्टिव्हलसाठी तरुणांमध्ये आतापासूनच उत्साह दिसत आहे.

या फेस्टिव्हलमुळे मोशी आणि शहराचा नावलौकिक खराब होऊ शकतो. शहरातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जाऊन त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीची सवय लागू शकते. यामुळे शासनाने, प्रशासनाने यास परवानग्या देऊ नयेत, अशा मागणीचे निवेदन मारुती भापकर यांनी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, महावितरण आणि परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांना दिले आहे.Loading…
Loading...