सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी अखेर शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने थरूर यांना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय.सुनंदा पुष्कर यांचा 17 जुलै 2014 रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी थरूर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत करण्याचा आरोप करण्यात आला होता.

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी कोर्टाने शशी थरूर यांना आरोपी केलं होतं. त्यानंतर शशी थरूर यांनी 3 जुलैला अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. थरूर यांचे वकिल विकास पाहवा यांनी अटक करण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने आक्षेप घेतला होता. तसेच एसआयटीचा तपास पूर्ण झाला असून, चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हंटले होते.

शिक्षण हे डोक्यावरील पदरापेक्षा जास्त महत्वपूर्ण – शशी थरूर

महावीर जयंती: गौतम बुद्धांचा फोटो शेअर केल्याने शशी थरूर झाले ट्रोल