वडिलांच्या स्मृतीदिनी तो झाला सब-इन्स्पेक्टर

dipesh shinde police

आपली ड्युटी बजावत असताना एका अल्पवयीन मुलाने केलेल्या मारहाणीमुळे जिव गमवावा लागलेले दिवंगत वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मुलाला पोलीस सेवेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून 25 वर्षीय दीपेश शिंदे याची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपेश हा बीएससी-आयटी पदवीधर असून, मलाडमधील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.

विलास शिंदे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिपेशला नियुक्ती पत्र दिले आहे. यावेळी बोलताना दिपेशने आपणही वडिलांप्रमाणे पोलीस सेवेत सर्वोत्तम काम करून दाखवू असं मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

https://twitter.com/CPMumbaiPolice/status/903560015838978048

२३ ऑगस्ट २०१६ रोजी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल असणारे विलास द=शिंदे हे खारजवळ आपली ड्युटी बजावत होते, त्यावेळी त्यांनी अहमद कुरेशी या अल्पवयीन मुलाला हेल्मेटशिवाय गाडी चालवताना पकडलं. त्याच्याकडे लायसन्सही नव्हतं. याबाबत चौकशी सुरु असतानाच कुरेशी याने भावाला बोलावून घेत विलास शिंदेंना मारहाण केली. या हल्ल्यात विलास शिंदे गंभीरजखमी होवून बेशुद्ध झाले. लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना 31 ऑगस्ट 2016 रोजी उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला होता.