fbpx

बाबरी आंदोलनप्रकरणी चंद्रकांत खैरेंना समन्स

टीम महाराष्ट्र देशा- श्रीरामजन्मभूमी, अयोध्या (फैजाबाद) प्रकरणी लखनौ येथील विशेष न्यायालयाने शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांना सीबीआयच्या वतीने समन्स पाठविले आहे. या समन्सनुसार खैरे यांना येत्या 28 नोव्हेंबर रोजी न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागणार आहे.

श्रीराम जन्मभूमी प्रकरणात पवनकुमार पांडे यांच्यासह अन्य कारसेवकांवर आरोप निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी साक्षीदार म्हणून खैरे यांना सीबीआयने घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. 1993 सालापासून सुरु असलेल्या या प्रकरणात येत्या 28 नोव्हेंबर रोजी राम जन्मभूमीसंबधीच्या खटल्यावर लखनौ न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी खैरे यांना समन्स बजावण्यात आले आहे.

मनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली

1 Comment

Click here to post a comment