मुंबई:- ड्रग्ज पुरवठा प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध ‘मुच्छड पानवाला’चा मालक रामकुमार तिवारी याला अटक केल्यानंतर आता एनसीबीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स धाडलं आहे. समीर खान यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत. ड्रग्जप्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पेने पाठवल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावल्याचं सांगितलं जातं.
एनसीबीच्या पथकानं मागील आठवड्यात खार परिसरातून ब्रिटिश नागरिक करण संजनानी व राहिल फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. समीर खान यांचा संजनानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध आहे? संजानी व समीर यांच्यात २० हजार रुपयांची देवाणघेवाण का झाली होती?, याची माहिती एनसीबीकडून घेतली जाणार आहे.
दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- …तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी आरपीआय आंदोलन करणार
- ‘शिवसेना विकासकामे करू शकत नाही फक्त फसवे जाहीरनामे देऊन जनतेची दिशाभूल करते’
- तुती रेशीम पिकाला आता कृषी पीक म्हणून मान्यता; विमा, कर्ज, भरपाई, अनुदानाचे लाभ मिळणार
- अंतिम सामन्यापूर्वी ब्रिस्बेन हॉटेलमध्ये टीम इंडिया वर ‘निर्बंध’…
- हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील- सचिन सावंत