शाळा १ मे पर्यंत सुरु ठेवण्याचा महाराष्ट्र प्राधिकरणाचा निर्णय रद्द

मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थांना आता १ मे नंतरच उन्हाळी सुट्टी मिळणार, असा महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने शासन निर्णय काढला होता. मात्र  महाराष्ट्र प्राधिकरणाचा निर्णय अधिकाऱ्यांना बोलवून रद्द केला जाईल. या निर्णयाची गरज वाटल्यास पुढच्यावर्षी याचा विचार करू, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. म्हणजे आता शाळा १ मेपर्यंत सुरू राहण्याचा निर्णय रद्द केला आहे.

शालेय विद्यार्थांची एप्रिलमध्ये जरी वार्षिक परीक्षा संपली तरी शाळेत जावं लागणार होत. महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने तसा शासन निर्णय काढला होता. त्यामुळे विद्यार्थांना आता ३० एप्रिलपर्यंत शाळेत जावे लागणार होते. एप्रिल महिन्यातील परीक्षा संपल्यानंतर शाळांमध्ये उन्हाळी शिबीरं, विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सरकारने तसे आदेश शाळांना दिले. मात्र तूर्तास हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

You might also like
Comments
Loading...