मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली आहे. मंगळवारी सकाळी अशी माहिती मिळाली की, उद्धव ठाकरे सरकारच्या १३ बंडखोर आमदारांनी गुजरातमधील सुरतमध्ये तळ ठोकला असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता अभिनेता सुमीत राघवन ने (Sumit Raghavan) देखील एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.
सुमितने एकनाथ शिंदे यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली म्हणाला, “साहेब, तुमच्या यादीत ‘महाराष्ट्र हित’ चौथ्या क्रमांकावर आहे आणि माझा मुद्दा हाच आहे. शिवसैनिक भरडले जात आहेत, त्यांचे खच्चीकरण होत आहे. अनैसर्गिक आघाडी वगैरे हे सगळं बरोबर आहे, पण जो सामान्य माणूस आहे तो सदैव मागेच राहणार. तो जो ‘आता’ आहे ना त्या वाक्यातला तो वेदना देणारा आहे.”
साहेब, तुमच्या यादीत "महाराष्ट्र हित" चौथ्या क्रमांकावर आहे.
आणि माझा मुद्दा हाच आहे.
शिवसैनिक भरडले जात आहेत,त्यांचे खच्चीकरण होत आहे, अनैसर्गिक आघाडी वगैरे हे सगळं बरोबर आहे. पण जो सामान्य माणूस आहे तो सदैव मागेच राहणार.
तो जो "आता" आहे ना त्या वाक्यातला तो वेदना देणारा आहे. //t.co/Qjleii78Lv— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) June 23, 2022
सुमीत राघवन हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :