औरंगाबाद : काल (२९ जून) ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले कि, “आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, त्यामुळे जाता-जाता त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र या निर्णयावेळी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय करीत होते? शहराचे, गावाचे, रस्त्याचे नाव बदलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाणेरडे राजकारण केले आहे, आघाडीच्या नेत्यांचा प्रतिमांना जोडे मारा. आम्ही कायदेशीर लढाई लढू, रत्यावर उतरु.” असा इशार जलील यांनी दिला. यानंतर औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनीही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्याचे खासदार श्री जलील साहेब यांनी संभाजीनगर नावाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा केली.मी या व्हिडिओच्या निमित्ताने मा.जलील साहेबांना इतकच सांगू इच्छितो की जर आपण रस्त्यावर आंदोलन करणार असाल तर संभाजीनगर येथील सर्व हिंदू बांधव आणि मनसे रस्त्यावर उतरेल. pic.twitter.com/IGbCIWzD2k
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) June 30, 2022
“जिल्ह्याचे खासदार जलील साहेब यांनी संभाजीनगर नावाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा केली. मी या व्हिडिओच्या निमित्ताने जलील साहेबांना इतकच सांगू इच्छितो की, जर आपण रस्त्यावर आंदोलन करणार असाल तर संभाजीनगर येथील सर्व हिंदू बांधव आणि मनसे रस्त्यावर उतरेल.”, असा इशारा मनसेनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतरावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde : भाजपसोबत मंत्रिपदांबाबत एकनाथ शिंदे यांचे ट्वीट! म्हणाले…
- Uddhav Thackeray : “चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…”, राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट
- Swara Bhaskar : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर स्वरा भास्करची ‘ती’ पोस्ट चर्चेत
- Imtiaz Jalil : औरंगाबाद नामांतराला मंजुरी मिळाली तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते काय करीत होते – इम्तियाज जलील
- Prakash Raj : “चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…”, प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<