ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुलभा ब्रह्मे यांचं (गुरुवारी) पुण्यात निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, अर्थतज्ज्ञ आणि लेखिका डॉ. सुलभा ब्रह्मे यांचं आज (गुरुवारी) पुण्यात निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या.

डॉ. सुलभा ब्रह्मे यांनी लोकायतच्या माध्यमातून लोककेंद्री विज्ञान आणि समाज-अर्थशास्त्र यातील विविध पैलूवर मराठीतून प्रबोधनात्मक लेखन केले होते. त्यांनी एन्रॉन, जैतापूर अणुवीज प्रकल्पाच्या विरोधी लोकचळवळीत सहभाग घेतला होता. त्यांनी प्लॅनिंग फॉर द मिलियन्स, प्रोडय़ुसर्स को-ऑपरेटिव्हज एक्सपिरीयन्स अँड लेसन्स फ्रॉम इंडिया, डॉटस् इन महाराष्ट्रा अशा विविध पुस्तकांचे लेखन केले.

You might also like
Comments
Loading...