सुजित झावरे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी निश्चित

टीम महाराष्ट्र देशा– बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर शिवसेनेच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल केल्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी गंभीर दखल घेत जि.प चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना दिले.

आ.पाटील यांनी याबाबत जिल्हाध्यक्ष पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांना तसेच जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना याबाबत आदेश दिले,यानुसार जिल्हाध्यक्ष फाळके यांनी सुजित झावरे यांना कारणे दाखवा नोटीस आजच बजावली.बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे सभापती असताना त्याविरोधात सेनेच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच लढत राहिली आहे. असे असतानाही झावरे यांनी शिवसेनेची मदत घेत स्वपक्षाच्या सभापती विरोधात सेनेच्या मदतीने अविश्वास ठराव दाखल केला.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल पक्षाने घेतली व झावरे याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.या नोटीसीला झावरे काय उत्तर देतात यापेक्षाही त्यांची राष्ट्रवादीतून जवळपास हकालपट्टीच झाल्याची मानले जाते,दरम्यान सुजित झावरे यांनी गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात संपर्क साधल्याचे बोलले जाते,राष्ट्रवादी कॉंग्रेस ने त्यांच्या विरोधात केलेल्या कारवाई मागे झावरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक ही मानली जाते.

कधीकाळी शरद पवारांनीच मंत्री करण्यास दिला नकार, आज केले प्रदेशाध्यक्ष!