राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेचं मला फसवलं – सुजित झावरे

स्वप्नील भालेराव\ पारनेर :संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्प्यात होणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जरी जाहीर असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता मात्र कमी झालेली नाही. कारण पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. त्यांनी पारनेर येथील ‘कार्यकर्त्यांनो मला काही सांगायचयया’ मेळाव्याचं आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेसने फसवलं आहे अस विधान केले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टिकवून ठेवण्याच काम खऱ्या अर्थाने माझे वडील स्व. वसंतराव झावरे यांनी केल असून, शेवटी आज पक्षाने वेगळ्याचं वाटेने जावून मला डावलण्याच काम पक्षाने केल. मी पक्षाला फसवल असे आरोप माझ्यावर जरी लादण्यात आले असले तरी उलट पक्षानेच मला फसवलेलं आहे. असे वक्तव्य सुजित झावरे यांनी केले आहे.

दरम्यान या मेळाव्यात सुजित झावरे यांच्या समर्थकांची तुम्ही भाजप मध्ये जा अशी भावना भाषणांमधून व्यक्त केली. सुजित झावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सडकून टिका केल्याने त्यांचा भाजप मध्ये जाण्याचा मानस आहे असे दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून मोठा धक्का बसू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या