fbpx

सुजयचा विजय पक्का ; नातेसबंध मध्ये येणार नाहीत – शिवाजी कर्डिले

टीम महाराष्ट्र देशा: विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करत भाजपने नुकताच पक्षात प्रवेश केलेल्या सुजय विखेंना नगर दक्षिणची उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही सुजय विखेंना शह देण्यासाठी नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. संग्राम जगताप हे भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे ‘किंगमेकर’ कर्डिले कुणाला मदत करणार यावर राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

‘नातेसंबंध मधी येणार नाहीत सुजय विखे हेचं विक्रमी मतांनी विजयी होणार आहेत’ असं विधान शिवाजी कर्डिलेंनी केलं आहे. राजकारण आणि नातेसंबंध हे दोन वेगळे मुद्दे आहेत. वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे ती मी पूर्ण करणार आहे, आणि भाजपच्याच सुजय विखे यांचाच प्रचार करणार आहे असं मत व्यक्त केल आहे.

दरम्यान, संग्राम जगताप यांचे वडील व विधानपरिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांनी कर्डिले हे आपल्यालाचं मदत करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता, मात्र शिवाजी कर्डिले यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे अरुणकाका यांच्या विधानातील हवा काढून घेतली आहे. तर, कर्डिले यांच्या या वक्तव्यामुळे सुजय विखे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे असचं म्हणावं लागेल.