fbpx

१९९९ ची पुनरावृत्ती करणार ,सुजय विखेंचे शरद पवारांना खुले आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये जाताच सुजय यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांना आव्हान देत आपली राजकारणातील पुढील दिशा स्पष्ट केली आहे. सुजय विखेंनी आम्ही १९९९ ची पुनरावृत्ती करणार असा इशारा शरद पवारांना इशारा दिला आहे.

एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आम्ही नगरमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करू शकतो,असं म्हणत त्यांनी १९९१ साली आम्ही बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता याचीही आठवण करून दिली. त्यामुळे यावेळेही १९९१ ची पुनरावृत्ती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याला प्रतिउत्तर म्हणून सुजय विखेंनीही शरद पवारांना आम्हीही १९९९ ची पुनरावृत्ती करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

काही दिवसात जिल्ह्यातील सेना-भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यात प्रामुख्याने खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचा समावेश आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आज प्रथमच नगरमध्ये हजेरी लावली, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्याचं स्वागत केलं.

1 Comment

Click here to post a comment