सुजय विखेंनी केली मध्यस्थी आणि राम शिंदे झाले निश्चिंत

टीम महाराष्ट्र देशा : कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत. कारण भाजप पक्षाशी बंडखोरी करणारे भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत भाजपात राहणार आहेत. खा. सुजय विखे यांच्या मध्यस्थीनंतर नामदेव राऊत यांचे बंड शमले असल्याच बोललं जात आहे. नामदेव राऊत भाजपातचं राहणार असल्याने विद्यमान आ. राम शिंदे हे निश्चिंत झाले आहेत.

अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना आव्हान ठरू पाहणारे कर्जतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचं मन वळवण्यात खासदार सुजय विखे यांना यश आलं आहे. खुद्द नामदेव राऊत यांनीचं पत्रकार परिषद घेऊन आपण भाजपातचं राहणार असल्याच सांगितल आहे. तसेच मनदेव राऊत यांची ताकद मोठी असल्याने त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी करून त्यांना थांबवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली, असं सुजय विखेंनी सांगितलं आहे.

दरम्यान कर्जत – जामखेड चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपचे विद्यमान आ. राम शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचं सांगितल जात आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीतचं नामदेव राऊत यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राम शिंदे अडचणीत चांगलीच वाढ झाली होती. मात्र सुजय विखे यांनी मध्यस्थी करून राम शिंदेंच्या लढाईतील मोठी अडचण दूर केली असल्याच म्हंटल जात आहे.

महत्वाच्या बातम्या