आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला, दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी खासदार सुजय विखे यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं म्हटले होते. त्यांनी साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे यांनी ‘देखणा माणूस आला तर त्याला पाहायला जायला पाहिजे’ असं विधान केले होते. यावर सय्यद यांनी माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून, त्यांनी माफी मागावी. अन्यथा, याबाबत महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे असं विधान केले होते.

याविषयी बोलताना खासदार सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी गुंडेगाव येथील भाषणात बोलताना आपण ‘देखणा माणूस’ असा शब्द वापरला आहे. देखणी महिला किंवा स्त्री असा शब्द प्रयोग नाही. त्यामुळे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी गैरसमज करून घेऊ नये. मी त्यांना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो, तरीही त्यांना तसे वाटत असेल तर मी माझे शब्द मागे घेतो असं विखे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ‘त्या भाषणात देखणा माणूस हा शब्द आहे. त्यात स्त्री लिंग, पुल्लिंग किंवा कोणाच्या नावाचा उल्लेख नाही. एवढ्या वर्षांच्या राजकारणात माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर संस्कार नाहीत, असा आरोप कधीच झाला नाही.देखणा माणूस आमचे कार्यकर्ते हराळ हे सुद्धा असू शकतात. तेही स्मार्ट आहेत. जीन्स घालून फिरत असतात असं विधान केले आहे.

दरम्यान, विखे यांनी माझ्या भाषाणामुळे कोणाला दु:ख झाले असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. आपण हे त्यांना उद्देशून मुळीच बोललो नव्हतो. स्त्री जातीचा किंवा कोणाच्या नावाचाही उल्लेख आपण केला नव्हता. मात्र, आपल्या शब्दामुळे कोणाला दु:ख होत असेल तर ते मागे घेण्याचा मोठेपणा आम्ही दाखवितो असं विखे म्हणाले आहेत.