सुजय विखे यांनी घेतली दिलीप गांधी यांची भेट, अर्धा तास बंद खोलीत चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून सुजय विखेंना उमेदवारी दिली आहे. यामुळे गांधी समर्थक नाराज आहेत तसेच सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिलीप गांधी यांची मनधरणी करण्यासाठी आधी भाजपचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे यांचे वडील आणि राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीप गांधी यांची भेट घेतली होती. तर आता सुजय विखे यांनी सुद्धा दिलीप गांधी यांची भेट घेतली आहे. दिलीप गांधी आणि सुजय विखे यांच्यात तब्बल आर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली असून या चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, दिलीप गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या मतांमध्ये विभाजन होऊन सुजय यांना अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळेच विखे पिता पुत्रांनी दिलीप गांधी यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Loading...

तर, भाजपाने तिकिट नाकारल्यामुळे गांधी समर्थकांचा मेळावा झाला. त्यावेळी बोलताना गांधी म्हणाले,सुवेंद्रला त्याचा विचार करण्यास स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्याने त्याचा निर्णय घेतला आहे. मी मात्र भाजप सोडणार नाही. आम्हाला देशाला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी पक्ष देईल ती जबाबदारी पार पडण्यास मी तयार आहे. भाजपने दिलेल्या उमेदवाराचा प्रचारही मी करणार आहे. अस असल तरी विखे भेटीनंतर गांधींनी आपल्या पुत्राला समजवणार असल्याचे सांगत सुवेंद्रचे बंड थंड होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मराठवाड्यातील पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे करणार लाक्षणिक उपोषण