सुजय विखे आज भाजपात प्रवेश करणार तर राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा नाही !

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकीय हालचाल मोठ्या जोरदार सुरु आहेत. आज मुंबई मधील गरवारे क्लब हाऊस इथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय विखे थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत.

तर , सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. नैतिकतेचा प्रश्न म्हणूण राजीनामा असल्याच बोललं जात होत.

Loading...

मात्र, सुजयच्या भाजप प्रवेशबाबत दिल्ली हायकमांडला कल्पना दिली. मी काँग्रेस पक्षातच आहे,राजीनामा देण्याबाबत आता विचार नाही अस राधाकृष्ण विखे- पाटील यांनी नुकतच स्पष्ट केलं आहे.

सुजय विखे यांच्या प्रचारासाठी भाजपची रणनीती काय असावी आणि पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर नेवासाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, राहुरी – पाथर्डीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात बैठक सुरु आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार