सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खा. गांधी राजकारणात

टीम महाराष्ट्र देशा : डॉ. सुजय विखेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून खासदार दिलीप गांधी समाजकारण, राजकारण करत आहेत. खासदार दिलीप गांधी यांच्यावर टीका करण्याची सुजय विखे यांची पात्रताच नसून आमच्या नादाला लागायचे नाही, नाद केलाच तर तो महागात पडेल.असा हल्लाबोल नरेंद्र मोदी आर्मीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पोटघन यांनी केला आहे.

डॉ. सुजय विखे हे नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघ पिंजून काढला असून दौर्यात कायमच भाजपचे खासदार गांधी यांच्यावर टिका केली. त्या टिकेला खा.गांधी समर्थक व मोदी आर्मीचे जिल्हाध्यक्ष पोटघन यांनी उत्तर दिले आहे.

डॉ. सुजय विखे कोणत्या पक्षाचे उमेदवार असोत, लोकसभा निवडणूक लढोत, त्याचा भाजपला काहीच फरक पडत नाही. भाजपचे सरकार आल्यापासून सर्व कामांचे टेंडर ऑनलाईन पध्दतीने होतात. सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची स्क्रुटनी करतो. विकासाची कामे टेंडर प्रक्रिया पूर्ण करणार्यांना मिळतात. त्यामुळे ठेकादारी अन् टक्केवारीचा विषय येतो कोठे?

खासदार गांधी यांनी मतदारसंघात विकास कामांचे जाळे विणले आहेत. त्यामुळेच देशभरातील कार्यक्षम 25 खासदारांमध्ये त्यांचे नाव आले आहे. भाजप कोणाचे नाव घेत नाही. तुमचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर उभे असताना भाजपच्या मदतीमुळंच खासदार झाले, हे विसरू नका. विखे उभे राहिले काय किंवा आणखी कोणी उभे राहिले काय? त्याचा भाजपला काहीच फरक पडत नाही.Loading…
Loading...