दिलीप गांधींच्या उपस्थितीत डॉ. विखेंचा उमेदवारी अर्ज दाखल

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकी मध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपने सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज सुजय विखे यांनी चांगलेचं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री महादेव जानकर , विधानसभेचे उपसभापती विजय औटी असे अनेक नेते मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे सुजय विखे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी देखील हजेरी लावली होती.

डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा. दिलीप गांधी हे नाराज झाले होते. त्यामुळे गांधींची आजची उपस्थिती ही विशेष ठरली आहे. अनेकांना गांधी हे उपस्थित राहणार का ? असा प्रश्न पडला होता. मात्र गांधी यांनी आज उपस्थित राहून नाराज नसल्याच सिद्ध केल आहे. याआधी दिलीप गांधी यांनी पक्षाचा प्रचार करणार असल्याचे घोषित केले आहे. मात्र त्यांचे चिरंजीव सुवेंद्र हे नाराज आहेत.

Loading...

दरम्यान आजच्या कार्यक्रमाला पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले व मोनिका राजळे, माजी आमदार बबनराव पाचपुते व अनिल राठोड, डॉ. विखे त्यांच्या पत्नी धनश्री यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.