‘राष्ट्रवादीच्या आजच्या स्थितीला राष्ट्रवादीचं जबाबदार’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी ‘आज राष्टवादीची जी वाताहत झालीय त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसच आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या उमेदवारीच्या संदर्भातही सुजय विखे यांनी भाष्य केले आहे.

सुजय विखे यांनी पुढे बोलताना मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला तयार झालो होतो पण त्यांच्या नेत्यांनी जुना संघर्ष बाहेर काढला. विखे कुंटूब संपविण्याचा घाट घातला. पण आमच्या रक्तात राजकारण. कोण किती हवेत आहे त्यांना जमिनीवर आणन्याचं काम विखे घरानेने केलंय असं विधान केले आहे. सुजय विखेंच्या या टीकेमुळे पवार-विखे हा राजकीय वाद पुन्हा एकदा पेटला आहे.

सुजय विखे हे राहुरीतील श्री डेव्होल्पर्सचा शुभारंभ कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विषेश पोलीस सन्मानित पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांचा खासदार विखेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुजय विखे यांनी इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.