‘तुम्हाला कमळ चालत नसेल तर मोदींचे दोन हजार रुपये परत करा’

टीम महाराष्ट्र देशा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले दोन हजार रुपये चालतात, तर मग त्यांचे कमळ का चालत नाही, असे विधान खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. ते कर्जत येथील प्रचार सभेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, राम शिंदे साहेब त्यांच्या सभेला म्हणजेचं विरोधी उमेदवार रोहित पवार जाणाऱ्या लोकांची यादी काढा. त्यांच्या खात्यातही मागील महिन्यात मोदींनी दोन हजार रुपये जमा केले आहेत. मोदींचे हे दोन हजार रुपये चालतात, मग त्यांचे कमळ का नको. तुम्हाला कमळ चालत नसेल तर ते पैसे काढून परत करा, आम्हाला गरीबांच्या कल्याणासाठी वापरता येतील. काही तरी नैतिकता ठेवा.असेही विखे म्हणाले.

तसेच केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’ जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी सरकारकडून सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्याचा पहिला हप्ता म्हणून अलीकडेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. त्याकडे विखे यांचा रोख होता.

दरम्यान कर्जत- जामखेड या विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर भाजप कडून राम शिंदे यांना उमदेवारी देण्यात आली आहे.राम शिंदे हे राज्यातील महत्वाच्या मंत्रीपदावर असल्याने त्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघातून पणाला लागलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून जनता राम शिंदे की रोहित पवार या दोघांपैकी कोणाला कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या