सुजय विखेंना शरद पवारांचा विरोधच ; नगरच्या जागेसाठी आग्रही

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या जागावाटपासाठी आघाडीच्या चर्चेच गुऱ्हाळ काही थांबायचं नाव घेत नाही. आघाडीच ४० जागांवर जरी एकमत झालंं असलंं तरी अजून ८ जागांसाठी घोंगडे भिजत ठेवले आहे. त्यात अहमदनगर दक्षिण मतदार संघाची जागा नक्की कोणाची यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आता थेट आमने-सामने आले आहेत. याचं दरम्यान नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागेसाठी काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांचे नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसणार असून जागावाटपाचा अंतिम निर्णय काय होतो याकडे लक्ष लागले आहे.

मतदारसंघात आमदार किती व कोणाचे आहेत, याचा विचार करतानाच दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला होती याचाही विचार करून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा ४० जागांचा निर्णय झाला आहे. नगर दक्षिणेतही विधानसभेतील दोन जागा राष्ट्रवादीच्या आहेत. उर्वरित चार ठिकाणी राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते आहेत. त्यामुळे आम्ही विनंती करू की, जे सूत्र सगळीकडे आहे तेच इथे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट करून दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शरद पवार नगरला आले होते. या कार्यक्रमानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशपातळीवर नव्हे, तर राज्यामध्ये आघाडी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असं शरद पवार म्हणाले आहेत.