‘वंचित आघाडी ही भाजपची बी टीम, हे महाराष्ट्रातील ४१ लाख मतदारांना वाटत नाही’

टीम महाराष्ट्र देशा : वंचित आघाडी ही भाजपची टीम असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पुत्र आणि वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे हे महाराष्ट्रातील ४१ लाख मतदाराना तरी वाटत नाही, असे म्हणत सुजात आंबेडकर यांनी विरोधकांना फटकारले आहे.भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विदयार्थी आंदोलन सम्यक संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

सुजात आंबेडकर म्हणाले की, वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचा बोललं जात आहे. अस कोण बोलतंय, हे अजून मला कळलेलं नाही. जे काही जण बोलतात त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादीशी काही ना काही छोटा मोठा संबंध आहे. मात्र वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे हे महाराष्ट्रातील ४१ लाख मतदाराना तरी वाटत नाही.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडी करत मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला होता. मात्र प्रकश आंबेडकरांच्या या तिसऱ्या पर्यायाचा मोठा फटका कॉंग्रेस आघाडीला बसला होता. तर याचा फायदा भाजप युतीला होताना दिसला. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीच्या काही नेत्यांकडून वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता.