सुजात आंबेडकरांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले…

blank

टीम महाराष्ट्र देशा : येत्या आठवड्यात राज्यामध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाण चालत सुरु आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पुढे केले जात आहे, याच मुद्यावरून वंचित बहूजन आघाडीचे युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबईमध्ये रस्त्यांची बिकट अवस्था आहे, शिवसेना मात्र उत्तर प्रदेशातल्या राममंदिराबद्दल बोलत आहे. आजवर कधीही आदित्य ठाकरे रस्त्यावर दिसत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत, असा टोला सुजातने लगावला आहे.

शिवसेना नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना सध्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रमोट केले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढत राज्यभरात दौरा केला आहे. त्यामुळे ते देखील जनतेमध्ये जाऊन आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.

आदित्य ठाकरे यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी सोमवारी दिले आहेत.