गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यासाठी माझ्याकडे काही सिक्रेट फॉर्म्युले आहेत : सुजात आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा- ‘बहुजन वंचित आघाडीच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्यासाठी माझ्याकडे काही सिक्रेट फॉर्म्युले आहेत. जे मी जाहीर करणार नाही,’ असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी सांगितलं आहे.ते काल सोलापुरात बोलत होते.

यावेळी बोलताना सुजात यांनी कॉंग्रेसवर चांगलीच सडकून टीका केली.प्रकाश आंबेडकरअकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसने अपप्रचार करणे बंद करावा असे आवाहन सुजात यांनी केले . आंबेडकरांच्या प्रचारासाठी मी पुढील ३० दिवस सोलापूर मुक्कामी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी ‘माध्यमांशी’ बोलताना दिली.