औरंगाबाद : पाचोड येथे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या केली आहे. हि घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. हिराबाई राजू डावरे असे मृत महिलेचे नाव असून त्या नांदर येथे वास्तव्यास होत्या.
हिराबाई या मुलगा आदित्य डावरे याच्या सोबत राहत होत्या. पतीच्या निधनानंतर गेल्या पंधरा वर्षापासून हिराबाई राजू डावरे व नांदर येथील माध्यमिक विद्यालयाचा शिपाई गोरख तुकाराम सोनवणे वय वर्षे ४५ यांच्यासोबत प्रेम संबंध असल्याने ते सोबत राहत होते. हिराबाई डावरे यांच्या नावावर नांदर येथे चार ते पाच गुंठे जागा असल्याने ही जागा माझ्या नावावर कर यावरून गोरख सोनवणे व हिराबाई यांच्यात रोजच वाद होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
याच जाचाला कंटाळून हिराबाई डावरे यांनी रविवारी मध्यरात्री कोणालाही न सांगता राहत्या घरामध्ये गळफास घेऊन, आत्महत्या केली असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती हिराबाई डावरे यांच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तुकाराम सोनवणे यांच्या जाचाला कंटाळून ही घटना घडली आहे. त्यांच्यावर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा आशी मागणी करत प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर पाचोड पोलिसांनी त्यांची समजूत काढली. या प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार फिरोज बडे व सुरेश शिंदे करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारमधील दोन आणि सरकारबाहेरील दोन लोकं मिळूनच सर्वकाही निर्णय घेत आहेत’
- रोहित शर्माच्या विश्वासानेच माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले केले – सूर्यकुमार यादव
- केंद्र सरकार सुशांतचा करणार सन्मान, नॅशनल ऍवॉर्डला नाव देण्याची शक्यता
- आरोग्य पद भरतीत मराठा समाजावर होणारा अन्याय दूर करा-राजेंद्र दाते पाटील
- मराठवाडा साहित्य परिषदेने नियोजित कार्यक्रम पुढे ढकलले