मराठा आरक्षणासाठी पुरंदरमध्ये आत्महत्या..

पुरंदर : मराठा आरक्षणासाठी आणखी एका युवकाने आपला जीव संपवल्याचा धक्कादाय बातमी समोर येत आहे. पुरांदारमधील दौंडज खिंडीत रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. दत्तात्रय तुकाराम शिंदे ( वय ३४) असे मृताचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे.

राज्यभरात सध्या मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटल्याच दिसत आहे, अनेक ठिकाणी आंदोलकांकडून एसटी बस आणि गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन देखील केले जात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा समाजातील आंदोलक आणि नेत्यांशी चर्चेच्या फैरी सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही.

दरम्यान, मराठा युवक काकासाहेब शिंदे यांनी घेतलेल्या जलसमाधीनंतर सुरू झालेले आत्महत्यांचे स्तर थांबतात दिसत नाहीये. पुरांदारमधील दौंडज खिंडीत रेल्वेखाली दत्तात्रय तुकाराम शिंदे याने आत्महत्या केली आहे.

मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला

bagdure

वंदना चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांचा ‘घंटानाद’

मराठा आंदोलकांनो सबुरीने घ्या : सुभाष देशमुख

You might also like
Comments
Loading...