मराठवाड्यात आत्म्हत्याचं सत्र सुरूच ;एकाच दिवशी २ आत्महत्या

एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवल्याने मराठवाडा हादरला

टीम महाराष्ट्र देशा- एकाच दिवशी मराठ्वायातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याने संपूर्ण मराठवाडा हादरला आहे .मराठवाडा आणि शेतकरी आत्महत्या हे एक समीकरणच झालं असून शिनिवार दि 16 रोजी बदनापूर तालुक्यातील लक्ष्मण नगर तांडा येथील एका शेतकऱ्याने तर बीडमध्ये शासकीय कार्यालयात विष घेतलेल्या शेतक-याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी ,परमेश्वर मगन राठोड यांनी कंडारी गावातील दत्तात्रय रंगनाथ फटाले यांच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते मात्र पैसे वेळेवर मिळत नसल्याने फटाले यांनी त्यांना धमकी दिली की पैसे नाही मिळाले तर केस करेल याच भीतीने परमेश्वर राठोड यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली . तर दुसरी घटना आहे बीड जिल्ह्यातील बीडमध्ये शासकीय कार्यालयात विष घेतलेल्या शेतक-याचा मृत्यू झाला आहे .इनामी जमीन पडताळणी प्रमाणपत्रासाठी वारंवार भू-सुधार कार्यालयात खेटे मारले, परंतु काम होत नसल्याने संतापलेल्या शेतक-याने १४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीत विष प्राशन केले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देणा-या या शेतक-याचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रल्हाद हरीभाऊ टेकाळे (नागापूर बु. ता.बीड) असे त्या शेतक-याचे नाव आहे. नागापूर येथे गट नं. १०६ मध्ये सय्यद शफिक सय्यद हमजा यांची २० आर एवढी इनामी जमीन आहे. कृषीक प्रयोजनासाठी ही जमीन टेकाळे यांना देण्यात येणार होती. यासाठी उपजिल्हाधिकारी यांचे जमीन विक्री संदर्भात पडताळणी प्रमाणपत्र/हस्तांतरण करण्याची परवाणगी पाहिजे होती. यासाठी टेकाळे हे वर्षभरापासून भु-सुधार कार्यालयात खेटे मारत होते. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी त्यांना टोलवाटोलवी करीत होते. १४ डिसेंबर रोजीही ते याच प्रमाणपत्रासाठी गेले होते. परंतु त्यांना अपेक्षित उत्तर मिळाले नाही. यावर वैतागलेल्या टेकाळे यांनी कार्यालयाच्या आवारातच विषारी द्रव प्राशन केले. यामध्ये त्यांना कार्यालयातील कर्मचा-यांनीच जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होती. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी नातेवाईकांची गर्दी जमली होती.

विष प्राशन केल्यानंतरच मिळाली परवानगी
टेकाळे यांनी विषारी द्रव प्राशन केल्यानंतरच वर्षभर झोपेत असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. १६ डिसेंबर रोजी पडताळणी प्रमाणपत्राला परवाणगी देण्यात आली. यावर उपजिल्हाधिकारी (सामान्य) यांची स्वाक्षरीही आहे. प्रशासनातील कामे करून घेण्यासाठी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत असून प्रशासनाचा गलथान कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

You might also like
Comments
Loading...