पुणे विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये विध्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

pune univarsity

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज घडला. रेश्मा गायकवाड (23, शिरूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती विद्यापीठातील मुलींच्या तीन नंबर वसतिगृहात राहत होती. तिच्यासोबत इतर चार मैत्रिणीही राहत होत्या. दरम्यान मैत्रिणी बाहेर गेल्यानंतर तिने रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अर्धा तसापूर्वी तिच्या मैत्रीणी रूमवर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. चतुरशृंगी पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली असून, मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Loading...