आमदाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने दिला मुख्यमंत्र्यांना आत्महत्येचा इशारा

पंढरपुर/टीम महाराष्ट्र देशा : भाजपा पुरस्कृत विधानपरिषदेचे सदस्य आ. प्रशांत परिचारक यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. याआधी सैनिक पत्नीच्या चारित्र्यावर सशंय निर्माण करुन बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी जनमानसातुन प्रतिमा गमावुन बसलेले प्रशांत परिचारक यांनी आत्ता बेकायदेशीर मालमत्ता हडपण्याचा मार्ग निवडला की काय असा सवाल उपस्थित होतोय . त्यांचे बंधु ऊमेश परिचारक व त्यांच्या खाजगी बँकेचे व्यवस्थापक हे माझी मालमत्ता दहशत दाखवुन लाटण्याचा प्रयत्न करित असल्याचा यांच्यावर थेट आरोप एका परिमल भाटे नावाच्या ऊद्योग व्यावसायिकाने केले आहेत.

परिमल भाटे हे स्वातंत्रदिनी 15 आँगस्ट रोजी नुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे सोलापुर जिल्ह्यात पुन्हा आ. परिचारक यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण होत आहे. परिमल भाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही दि. 29 मार्च 2004 रोजी अर्बन बँकेकडे गहाण टाकलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन जी मालमत्ता दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार दि. 28 एप्रिल 2011 रोजी आमच्या नावावर झाली, ती मालमत्ता 2004 च्या कागदपत्रावर लिहिली गेली.

तसेच आमच्या नावावर नसलेली मालमत्ता जी आजतागायत अस्तित्वातच नाही ती लिहीली गेली. याविरुध्द पंढरपूर पोलिस ठाण्याकडे तक्रार केली असता याची दखल पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे दि. 16 एप्रिल 2016 रोजी आम्ही कोर्टाकडे न्याय मागण्यासाठी तक्रार केली. बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक, संचालक मंडळ व अधिकारी यांच्या विरुध्द न्यायमुर्तींना तथ्य आढळून आल्याने सदर केस पी.सी. 202 कलमान्वये तपासणी व्हावी म्हणून मा. कोर्टानी पंढरपूर पोलीस स्टेशनला पाठवले.

परंतु त्यावर कोर्टाकडून वारंवार रिमायंडर पाठवूनही कोर्टाच्या आदेशाची दखल पोलिसांनी घेतली नाही. पंढरपुरातील हिमराज या आमच्या शितगृहाचा परस्पर लिलाव केला. मात्र पुण्यातील डीआरटी’ या न्यायाधिकरणाने हा लिलाव बेकायदा ठरवत आमच्या बाजूने निकाल दिला. तरीही आमदार प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्याकडून त्रास सुरूच आहे. या दोघांविरोधात पंढरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तरी पोलीस दबावाखाली काम करीत आहेत.

आपल्यासारखा अन्याय झालेले अन्य दहा ते पंधरा लोक आहेत. मात्र परिचारक बंधूंच्या दहशतीला कंटाळून ते पुढे येत नाहीत, असा दावा भाटे यांनी केला आहे. पंढरपूर अर्बन बँकेककडून घेतलेल्या गहाण खत कर्जाच्या कागदपत्रात परस्पर बदल करून आमची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भाटे यांनी केला आहे.

या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही पंढरपूरमधील पोलीस यंत्रणा कोणतीच कार्यवाही न करता परिचारक यांना मदत करण्याचे काम करीत आहे. उलट आम्हांंला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनदेखील जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत आहे. अनेक पातळ्यांवर आमची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीच दखल घेत नाही. त्यामुळे नाईलाजाने येत्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाटे यांनी दिला आहे.

याआधी देखील भारतीय सैन्यांच्या पत्नीबद्दल अतिशय अश्लिल वक्तव्यामुळे भाजपाचे विधानपरिषद सदस्य पदावरुन रद्द करण्यात आले होते. पण सत्तेचा वापर करित पुन्हा पदानर आले. आजही त्या वक्कव्याचा रोष माजी सैन्यामधुन कमी झाला नाही. तोपर्यंत लगेच नव्या वादाला परिचारक यांनी तोंड फोडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणुन परिचारक परिचीत आहेत. त्यामुळे क्लिन चिट मिळणार की पिडीताला न्याय याकडे अनेकांच्या नजरा आहेत. जर आज राज्याला आर.आर.आबा पाटिल यांच्यासारखा गृहमंत्री असते. तर राज्यात विठ्ठलाच्या पंढरीत ही जुलुमशाही दिसलीच नसती असा सुर पंढरीचे वारकरी आणी छोटे मोठे व्यापारी करित आहेत.

रिलायन्स एनर्जीकडून कोटयावधीचा कर वसूल करुन दाखवा – छगन भुजबळ