बाप हातमजुरी करतो तर आई धुणीभांडी, लेकीने ९४ टक्के गुण मिळवत कष्टाचे चीज केले…

suhani dhake

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थीनीचा निकाल ९६.९१ टक्के लागला असून विद्यार्थीचा – ९३.९० टक्के लागला आहे. तर यंदाही राज्यात मुलीच अव्वल आहेत. दुसरीकडे सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के लागला असून सरासरी माघील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.

दुसरीकडे अशाच हातमजुरी आणि धुणीभांडी करणाऱ्या पालकाच्या मुलीने दहावी स्टेट बोर्डाच्या उत्तम यश प्राप्त करत कलेक्टर बनण्याच्या दिशेने पाहिले पाऊल ठेवले आहे. वाठोडा श्रावणनगरात राहणाऱ्या सुहानी ढोके हिने दहावीत ९४.४० टक्के गुण घेत विश्वास माध्यमिक विद्यालयातुन प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिला दोन मोठ्या बहिणी आहेत. तिचे वडील किशोर ढोके हातमजुरी करतात तर कुटुंबाला आर्थिक हातभार लाभावा म्हणून तिची आई विद्या ढाके या हॉटेलमध्ये धुणीभांडी करतात.

शेतकरी बाप गेल्याचं दु:ख पचवत सानिकाने परीक्षा दिली, ९७ टक्के गुण मिळवत पांग फेडले

सुहानी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे आणि शाळेतील शिक्षक तिला विविध स्पर्धांमध्ये प्रोत्साहन देत असतात. विविध संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या राज्य व जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत ती गेल्या तीन वर्षांपासून प्रथम क्रमांक पटकावत आहे. आई-वडील दोघेही मोलमजुरी करत असल्याने कुटुंबाचा गाडा चालतो आहे. मात्र मजुरांची मिळकत किती असते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्या अनुषंगाने सुहानीने शाळेतील शिक्षकांच्या मदतीने दहावीच्या अभ्यासास सुरुवात केली. मैत्रिणींच्या आग्रहाखातर तिने अतिरिक्त ट्युशन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळेतील शिक्षकांवर विश्वास ठेवत नंतर ट्युशनचा नाद सोडला.

सकाळी ५ वाजता उठणे, व्यायाम करणे आणि सकाळी ७ वाजतापर्यंत अभ्यास करणे, ही तिची दिनचर्या. नंतर शाळेतील अभ्यास करणे आणि शाळेत जाणे. अश्या नियोजनबद्ध प्रक्रियेतून तिने ९४.४० टक्के गुण प्राप्त केले. आता विज्ञान शाखेत गोडी असल्याने ११ वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे आणि एक एक टप्पा गाठत कलेक्टर बनण्याचे स्वप्न साकार करणार आहे.

पीकविमा भरताना येणारी अडचण धनंजय मुंडेंनी तत्काळ सोडवली !