ऊसाचा प्रश्न पेटला ; ऊसाच्या गाड्यांना पोलीस संरक्षण

sugarcane

टीम महाराष्ट्र देशा – माजलगाव तालुक्यात उसाचा प्रश्न चांगलाच पेटला असून उद्या शनिवारी माजलगाव बंदची हाक देण्यात आली असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे तर दुसरीकडे साखर कारखानदार उसाच्या गाड्या पोलिस संरक्षणात नेत आहेत. उसाला 3500 रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली. काल सहकारमंत्री आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यात चर्चा झाली. मात्र या चर्चेत कुठलाही प्रश्न निकाली निघालेला नसल्याने आता माजलगाव बंदची हाक देण्यात आली आहे. गंगाभीषण थावरे यांनी या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे .