टीम महाराष्ट्र देशा: थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात घट झाल्यामुळे केसांवर (Hair) वाईट परिणाम दिसायला लागतात. थंडीमुळे केसातील आर्द्रता नष्ट होते. परिणामी केस कोरडे (Dry Hair) होऊन केसांच्या गळण्याचे (Hair Fall) प्रमाण वाढते. त्याचबरोबर केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण देखील वाढू लागते. हिवाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले अनेक रसायनयुक्त प्रोडक्स वापरण्याचा विचार करतात. पण हे रसायनयुक्त उत्पादने केसांना लावल्यावर केसांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत. जे वापरल्यावर हिवाळ्यामध्ये तुमची केस गळती थांबू शकते.
तुप
हिवाळ्यामध्ये नियमित तुपाचे सेवन केल्याने केस आणि त्वचा दोन्हीही निरोगी राहू शकते. तुपाने डोक्याला मसाज केल्याने केस गळतीची समस्या कमी होऊ शकते. त्याचबरोबर केसांना तुपाने मसाज केल्यावर चांगली झोप देखील लागते. पण तुपाचा मर्यादित वापरच सुरक्षित मानला जातो. त्यामुळे तुपाचा वापर करताना नेहमी हे लक्षात ठेवायचे. हिवाळ्यामध्ये तुम्ही तूप हलके गरम करून टाळूला त्याने मसाज करू शकतात. पंधरा मिनिटे तूप डोक्यावर ठेवल्यानंतर डोके कोमट पाण्याने धुवा. नियमित टाळूला तुपानी मालिश केल्यावर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.
आवळा
हिवाळ्यामध्ये बाजारात आवळे सहज उपलब्ध असतात. आवळ्याचे सेवन करणे जवळजवळ केसांच्या प्रत्येक समस्येवर इलाज आहे. त्यामुळे हिवाळ्यात केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश केलाच पाहिजे. आवळ्याच्या सेवनाबरोबर तुम्ही आवळ्याचे तेल देखील केसांना लावू शकतात. त्याचबरोबर तुम्ही आवळायुक्त पदार्थांचे सेवन देखील करू शकतात.
तीळ
हिवाळ्यामध्ये केस गळतीची समस्या टाळायची असेल, तर तुम्ही हंगामी तिळाचा आपल्या आहारात समावेश करू शकतात. तीळ किंवा तिळाच्या तेलाच्या मदतीने हिवाळ्यात केस निरोगी ठेवता येऊ शकतात. तुम्ही हिवाळ्यामध्ये नियमितपणे तिळाच्या तेलाने केसांची मसाज केल्यास केस गळतीची समस्या कमी होऊ शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Deverakonda | अभिनेता विजय देवरकोंडा ED च्या धारेवर, तब्बल 12 तास चौकशी
- Chandrakant Khaire | “फुटू नये म्हणून शिंदे गटाच्या आमदारांना आणखी 5 कोटी दिले”; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट
- Raj Thackeray | शरद पवार स्वत:हून कधीही छत्रपची शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे नाहीत – राज ठाकरे
- Uddhav Thackeray | “आता घराबाहेर पडलो तर यांच्या पोटात…”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
- Raj Thackeray | राष्ट्रवादी काँग्रेसने जातीय राजकारण सुरू केले ; राज ठाकरेंचा आरोप