Share

Health Care Tips | सर्दी खोकल्याच्या समस्या पासून त्रस्त आहात?, तर करा हे घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: हवामान (Weather) बदलते तसे शरीराचे आरोग्य (Health) देखील बदलते. आणि या बदलत्या वातावरणामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या मौसमी आजारांना सामोरे जावे लागते. हे आजार जास्त काळ टिकत नाही परंतु जेवढे दिवस हे आजार असतात त्या दिवसांमध्ये आपले संपूर्ण शरीर कोमजून जाते. आजारांवर अनेक औषधी बाजारामध्ये उपलब्ध आपण ते औषधी सारखे सारखे घेऊ शकत नाही. कारण नियमित या औषधींचे सेवन केल्याने आपल्या शरीराला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे या मौसमी आजारांसाठी आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत जे केल्याने तुमचे हे मौसमी आजार बरे होते.

बदलत्या हवामानामध्ये आरोग्य (Health) सुदृढ ठेवण्यासाठी पुढील उपाय करा

हळद

जर तुम्हाला बदलत्या वातावरणामुळे घसा दुखीचा त्रास होत असेल तर हळद तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा हळद चांगली उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर या उकळलेल्या हळदीच्या पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा गुळणी करावी लागते. असे केल्याने तुमच्या कशाला आराम मिळून संपूर्ण संसर्ग निघून जाईल.

हळद, आलं आणि काळी मिरी

या थंडीमध्ये जर तुम्हाला सर्दी आणि घसा दुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही त्यासाठी हळद, आले पावडर आणि काळी मिरी यांचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आले पावडर आणि अर्धा चमचा काळीमिरी एकत्र करून त्यामध्ये एक चमचा मध मिसळावा लागेल. तयार झालेल्या या मिश्रणाचे तुम्ही दिवसातून करा. या मिश्रणाच्या सेवनाने तुम्हाला सर्दी पासून लवकरच मुक्ती मिळेल.

मिठाचे पाणी

या बदलत्या वातावरणात तुम्हाला जर खोकला आणि सर्दी झाली असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने या त्रासातून मुक्त होऊ शकतात. तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळणी करावी लागते. हे केल्याने तुम्हाला बराच आराम मिळेल.

मध आणि लिंबू

तुम्ही जर खोकल्यापासून त्रस्त असाल तर मध आणि लिंबू याच्या सेवनाने तुमचा खोकला दूर होऊ शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये दोन-तीन थेंब लिंबाच्या रसाचे टाकावे लागतील. याचे रात्री झोपण्यापूर्वी सेवन केल्याने तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की लिंबू आणि मध या मिश्रणाचा लहान मुलांसाठी उपयोग करू नका.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: हवामान (Weather) बदलते तसे शरीराचे आरोग्य (Health) देखील बदलते. आणि या बदलत्या वातावरणामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप, …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now