…या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांत फूट पाडली-मोहन भागवत

…या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांत फूट पाडली-मोहन भागवत

mohan bhagvat

उत्तर प्रदेश: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी फाळणीच्या वेळी भारताला जे भोगावं लागलं ते विसरता येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामं करण्यासाठी सक्षम व्हायला हवं, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

नोएडामध्ये कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात झालं. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले, आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवं. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगलं करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तर भारताच्या फाळणीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, भारताने फाळणीच्या काळात जे सोसलं आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळं पूर्वीसारखं होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असं मानणारी ही विचारधारा नाही. मात्र इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचं, लढाईचं मूळ हेच होतं. त्यामुळे या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडली. हा २०२१ मधला भारत आहे, १९४७ मधला नाही. एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही. असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: