…तर मग भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव मांडण्याचा प्रश्नच येत नाही

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती नाही म्हणजे नाहीच होणार असा पुनरुच्चार करून भाजपच्या युती करण्याच्या मनसुब्यांवर पाणी ओतल आहे. आता भाजपकडून सुद्धा प्रथमच सेनेच्या या ताठर भूमिकेवर प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेलाच जर युती नको असेल तर मग भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव मांडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलीय.

आत्तापर्यंत फक्त शिवसेनेकडूनच ताठर भूमिका घेतली जात होती मात्र आता भाजपने सुद्धा थेट उत्तर दिल्याने युतीचे भविष्य अधांतरीतच आहे.